Sunday, January 13, 2013

अर्जुनाची निवड.


महाभारतातील एक गोष्ट. अर्जुन आणि एकलव्य दोन्ही निष्णात धनुर्धर. त्यावेळचे नावाजलेले गुरु द्रोणाचार्य एकलव्याचे धनुर्धारी क्षेत्रातील नैपुण्य पाहून चिंतीत होतात आणि त्यानंतरची गोष्ट आपल्या सर्वांना माहितच आहे. शेवट असा होतो की अर्जुन हा पुढील स्पर्धांसाठी निवडला जातो तो त्याच्या घराणेशाही मुळे. त्याचे एकलव्यासारखे त्याच्या इतकेच तुल्यबळ प्रतिस्पर्धी केवळ राजघराण्यातील नसल्याने डावलले जातात.

निरीक्षण असे की एकलव्य आजही आहेत. मुंबई रणजी संघाच्या १४ वर्षे खालील संघाच्या निवडीने प्रभावित अनामिक एकलव्या, तुझ्यासाठी हे सहानभूतीचे दोन शब्द!
 

2 comments:

  1. केवळ घराणेशाहीमुळे अर्जुन निवडला गेला असं आत्ता लगेच म्हणावं का?
    थोडी वाट पाहीन मी - कळेलच सत्य काही दिवसांत.
    (मोठ्या आईबापाच्या घरी जन्माला आलं की गुणवत्ता नसतेच असं तरी का गृहित धरावं?)

    ReplyDelete
  2. हा ब्लॉग अतिशोयक्तीचे उदाहरण आहे हे मान्य. मी सचिनचा निस्सीम चाहता होतो आणि आणि अजूनही आहे. परंतु त्याच्याकडून मैदानाबाहेर आदर्श वागण्याची अपेक्षा होती. बऱ्याच बाबतीत त्याला तडा गेला आणि त्यामुळे निराशा झाल्याने असा राग कधी कधी बाहेर पडतो.

    अर्जुनच्या निवडीसंबंधी काही आकडेवारी पेपर मध्ये वाचून हे लिहले. केवळ आकडेवारीचा विचार करता अजून बरेच खेळाडू आहेत असा एकंदरीत रोख. आकडेवारी फसवी असते हे मलाही मान्य. देव करो आणि अर्जुन माझे म्हणणे चुकीचे ठरवो

    ReplyDelete