साधं सुधं आणि NES VASAI 1988 Batch ह्या दोन ब्लॉगवरील गेल्या आठ वर्षातील ब्लॉगपोस्टचे वर्गीकरण !! ह्यातील कोणत्याही पोस्टवर क्लिक करुन थेट त्या पोस्टवर आपण जाऊ शकता.
Saturday, February 9, 2019
Saturday, July 9, 2016
निरोप!
प्रिय वाचकहो!
मी मागील जवळजवळ दोन वर्षांपासुन "साधं सुध" ह्या ब्लॉगवर स्थलांतरित झालो आहे. आपल्यातील काही जण अजुनही ह्या ब्लॉगलाच भेट देत असता, म्हणुन मी "साधं सुध" वर प्रकाशित केलेल्या प्रत्येक पोस्टची लिंक इथं देत असे. परंतु हे काहीसं संभ्रम निर्माण करणारं बनत होतं कारण एकाच पोस्टच्या दोन लिंक दोन ब्लॉगवर प्रकाशित व्हायच्या. ह्या कारणास्तव ह्या पुढे मी फक्त "साधं सुध" वर माझ्या पोस्ट्स प्रकाशित करत राहीन.
आपण गेले सहा वर्षाहून अधिक कालावधीत मला आणि ह्या ब्लॉगला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार !
आदित्य पाटील
साधंसुध ची लिंक - साधंसुध
Saturday, July 2, 2016
"मेसी" क्षण !
ह्या आठवड्याची सुरुवात काहीशी निराशाजनकच झाली. सकाळी साडेपाचला अर्जेंटिना आणि चिली ह्यांचा सामना पाहण्यासाठी उठू पाहणाऱ्या सोहमला साडेसहा वाजता उठण्यास तयार करण्यास मी यश मिळविलं. मध्यंतरानंतरचा सामना पूर्ण पाहता येईल ह्या गोष्टीवर तो तयार झाला. पण सामना मात्र पुर्ण वेळेत आणि त्यानंतरच्या अतिरिक्त वेळेत सुद्धा गोलशुन्य बरोबरीत राहिला. सोहम स्कुल बसला गेला आणि पेनल्टी शूटआऊटमध्ये मेसीची पहिलीच किक गोलपोस्टच्या बाहेर गेली. पुढे अर्जेंटिना हा कोपा अमेरिका स्पर्धेचा अंतिम सामना हरली.
बार्सिलोनातर्फे क्लब पातळीवर खेळताना अगदी अविस्मरणीय यश मिळविणाऱ्या मेसीचा अर्जेंटिनातर्फे खेळताना महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील चौथ्या महत्वाच्या अंतिम सामन्यातील हा पराभव! आपल्या देशाला सर्वोत्तम बहुमान मिळवून देण्यात अपयश आल्याचं शल्य मेसीच्या हृदयात आधीपासुन होतंच; त्यात रविवारी आपली पेनल्टी किक चुकल्याचं दुःख त्याला अगदी हताश करुन गेलं आणि त्यानं तडकाफडकी आंतरराष्ट्रीय पातळीवरुन निवृत्ती पत्करली. हा तो "मेसी" क्षण !
शिखरमार्ग !
१) दीर्घ दिनचर्या -
हल्ली सर्वच क्षेत्रात दीर्घ वेळ काम करावं लागतं. इतकंच नव्हे तर काही जणांना विविध शहरांत, देशांत सतत प्रवास करावा लागतो. बहुतेक वेळा दीर्घ प्रवासानंतर इच्छित स्थळी पोहोचल्यावर तात्काळ आपल्या कामास किंवा अगदी महत्वाच्या मिटिंगला सुरुवात करावी लागते. तिथं वेगळ्या प्रकारचा आहार मिळतो त्यास सुद्धा जमवुन घ्यावं लागतं. ह्या सर्व बदलत्या परिस्थितीचा मुकाबला करताना ज्यावेळी प्रत्यक्ष कामास सुरुवात होते त्यावेळी तुम्ही आपली सर्वोत्तम कामगिरी सादर करावीत अशी अपेक्षा असते.
सैराट - एक विश्लेषण !
बहुतांशी सर्वसामान्य माणसं दोन विचारसरणीने जीवन जगत असतात.
पहिली विचारसरणी (धोपटमार्गाने वाटचाल) - त्यांच्या जीवनाचा बराचसा भाग हा आपल्या चरितार्थाची सोय लावण्यात व्यापून गेलेला असतो. लहानपणापासुन आईवडील त्यांना लवकरात लवकर आपल्या पायावर उभा राहायला शिक असं सांगुन त्यांच्या मतीनुसार शिस्तीतल्या जीवनाचा स्वीकार करण्याचा उपदेश करीत असतात. ह्या विचारसरणीनुसार वागताना विशिष्ट वयात शाळा पास होणे, नोकरीधंद्याला लागणे, आई वडिलांनी निवडलेल्या साथीदाराशी लग्न करणे, पुढे पालक म्हणुन मुलांचे संगोपन करणे, मग आदर्श आजी आजोबा बनणे, भजनाला जाऊन बसणे असा मार्ग साधारणतः सांगितला जातो.
Monday, June 13, 2016
मुंबई पुणे एक्सप्रेस वे अपघात
मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा २००२ सालापासुन कार्यान्वित झालेला देशातील पहिला सहा मार्गिकेचा द्रुतगती महामार्ग आहे. ह्या महामार्गावर ठिकठिकाणी टोल गोळा केला जातो. ह्या टोलची एकंदरीत रक्कम किती ह्याविषयी एकंदरीत गुप्तता पाळण्याचेच धोरण दिसुन येतं. ह्या महामार्गाने मुंबई पुणे प्रवासाचे अंतर हे सरासरी दोन तासावर आणलं आहे असं म्हणता येईल.
http://patil2011.blogspot.in/2016/06/blog-post.html
दहावीची शिकवणी !
Sunday, June 5, 2016
इंटरनेट ऑफ द .. - भाग २
नारदमुनी मोठ्या आशेने महाराष्ट्र देशी अवतरले खरे पण लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या सर्व निर्मात्यांनी त्यांना जवळजवळ ठुकरावूनच लावलं.
"आमचं व्यवस्थित चाललंय! सासु, सुना, सासरे, नणंद, जाऊ, दीर, प्रियकर हे घटक एका बाजूला, प्रेमळ, खाष्ट, धूर्त वगैरे स्वभावछटा दुसऱ्या बाजुला घेऊन मनाला येईल तशा व्यक्ती आणि स्वभावछटा ह्यांच्या जोड्या बनवायच्या. बेस्टचा बसस्टॉप, रिक्षावाला, ज्यूसवाला अशी पात्रं घुसवायची. त्यात उत्तर भारतीय व्यक्तिरेखा घुसावायच्या कि मग पुरुषमंडळी सुद्धा रस घेऊन पाहतात मग हे नवीन खूळ हवाय कोणाला!" एकंदरीत सर्वांच्या बोलण्याचा सारांश होता.
इंटरनेट ऑफ द .. - भाग १
नारद मुनी नेहमीप्रमाणे स्वर्गात प्रवेश करते झाले. "नारायण नारायण" म्हणतच त्यांनी विष्णुदेवांना प्रमाण केला. विष्णुंनी त्यांचा प्रणाम स्वीकारला खरा पण भगवान विष्णुंची चिंतातुर मुद्रा नारदमुनींच्या नजरेतुन सुटली नाही.
"प्रभो आपण अगदी चिंतीत दिसत आहात! स्वर्गलोकी सर्व काही ठीक तर आहे ना?" नारदांनी विष्णुंना प्रश्न केला.
Fast Tracking
जून उजाडला! सरणाऱ्या प्रत्येक वर्षागणिक शालेय जीवनातील मनात दडलेल्या जूनच्या आठवणी जुन होत असल्या तरी अजुन मनात दडुन बसल्या आहेत. वर्गशिक्षिका कोण असणार ह्याची उत्सुकता मे महिन्याच्या सुट्टीच्या शेवटच्या आठवड्यात अगदी उचल धरुन यायची. आता रम्य आठवणींचं ते S.S.C. बोर्डची लोकमान्यता अगदी ओहोटीस लागली. बहुतांशी सर्वजण C.B.S.E, I.C.S.E अथवा I.B. बोर्डात आपल्या मुलांना प्रवेश देऊ लागलो.
एकोणतीस सक !!
लहानपणीची गोष्ट! सहावीत असताना शाळेत एका सरांनी वर्गात आम्हां मुलांना आव्हान दिलं, सर्वांसमोर येऊन २९ चा पाढा बोलुन दाखविण्याचं! मी ते स्वीकारलं का सरांनी ते मला स्वीकारायला भाग पाडलं हे आठवत नाही पण मी समोर आलो आणि २९ चा पाढा सुरु केला. २९ सक १७४ आणि २९ साता २०३ मध्ये कोठेतरी गडबडलो. गानू सर होते ते! त्यामुळे हातावर छडीचा प्रसाद घेऊन जागेवर परतण्याशिवाय पर्याय नव्हता.
इस्त्री
शाळा आणि महाविद्यालयातील गोष्ट! तो काळ एकतर वेगळा होता किंवा मी वेगळा होतो किंवा दोन्हीही! म्हणजे शाळेच्या वेळी खात्रीपुर्वक मी सांगु शकतो की आम्ही सर्वजण बिना इस्त्रीचे कपडे परिधान करायचो. महाविद्यालयात माझ्या बाबतीत परिस्थिती बदलली नव्हती आणि आजुबाजूच्या मुलांचे निरीक्षण करुन त्यांनी इस्त्री केलेले कपडे परिधान केले आहेत की नाही हे पाहण्याइतकी माझी कुतुहूलशक्ती विकसित झाली नव्हती. पण बहुदा रुपारेल आणि SPCE ह्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांचे आधिक्य असलेल्या कॉलेजात माझं शिक्षण झाल्याने बहुतांशी हीच परिस्थिती असावी असं मला वाटत!
http://patil2011.blogspot.in/2016/05/blog-post_23.html
Monday, May 16, 2016
बावखल
http://patil2011.blogspot.in/2016/05/blog-post_47.html
वसई गेले काही वर्षांपासुन सामाजिक स्थित्यंतराचा अनुभव घेत आहे. हे स्थित्यंतर जसे वसईतील नागरिकांच्या व्यवसायातील / राहणीमानाच्या बदलांच्या स्वरुपात आढळुन येतं त्याचप्रमाणे ते त्यांच्या विचारसरणीत होणाऱ्या बदलांच्या स्वरुपात देखील आढळुन येतं.
वसईतील बराचसा समाज हा काही काळापुर्वी शेतीप्रधान होता. वाडवडिलार्जित शेतीवाडीवर उपजिवीका करणे हा बऱ्याच समाजाचा मुख्य व्यवसाय होता. वाडीतील पिकांच्या सिंचनासाठी त्यावेळी बैलजोडीवर हाकले जाणारे रहाट असत आणि विहिरीऐवजी छोटी तळी ज्यांना बावखल म्हणुन संबोधिले जाते त्यांचा वापर केला जात असे. त्याकाळी विहिरीऐवजी बावखलांची प्रथा वसईत रूढ का झाली असावी ह्याविषयी अधिकृतरित्या माझ्याकडे संदर्भ उपलब्ध नाहीत. पण जमिनीची मुबलकता आणि कदाचित विहिरी खणण्यासाठी / तिला बंधारा घालण्यासाठी बाह्य घटकांवर असणारी अवलंबिता ही मुख्य कारणे बावखलांची लोकप्रियता वाढीस लागण्यासाठी कारणीभूत असावीत.
http://patil2011.blogspot.in/2016/05/blog-post_47.html
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ८ - ९
http://patil2011.blogspot.in/2016/05/blog-post_10.html
खरंतर प्रत्यक्षातील ही सहल आटोपून ४० दिवस होतं आले. पण ह्या शृंखलेच्या माध्यमातुन ही सहल पुन्हा एकदा अनुभवली. आज शेवटच्या ह्या दोन्ही दिवसांचं एकत्रित वर्णन ह्या भागात करतोय!
जिम कॉर्बेटचे वर्णन लिहिताना तिथल्या कडीपत्याचे वर्णन करायचं राहुन गेलं. जीपच्या आजुबाजूला बागडणाऱ्या ह्या कडीपत्याची चव घेण्याचा मोह आम्हांला आवरत नव्हता. पण नियमानुसार जीपमधुन बाहेर उतरून ह्याचे पान तोडण्याची परवानगी नव्हती. जणु काही तीन तासात केवळ डरकाळी ऐकवणारा वाघ आमचं एक पाऊल जीपबाहेर पडताच एक दमदार उडी मारुन आम्हांला घेऊन जाणार होता.
http://patil2011.blogspot.in/2016/05/blog-post_10.html
Sunday, May 1, 2016
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ७
http://patil2011.blogspot.in/2016/05/blog-post.html
वीणा वर्ल्डच्या इतिहासात आम्ही प्रथमच आंघोळ न करता बाहेर पडणार होतो. जंगलात भयंकर धुळ उडण्याची शक्यता लक्षात घेता सफारी नंतर परतल्यावरच आंघोळ करणे कसे सयुक्तिक ठरेल ह्यावर सचिनने अख्खी अडीच मिनिटे खर्च केली होती. सकाळी साडेपाच वाजता नाही म्हणा कितीजणं आंघोळ करून तयार झाली असती हा एक महत्त्वाचा मुद्दा होता.
इतक्या भल्या पहाटे उठण्याची सवय नसल्याने काहीसे संभ्रमावस्थेत असलेले चेहरे!
http://patil2011.blogspot.in/2016/05/blog-post.html
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ६
http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_30.html
आज सहावा दिवस ३० मार्च! आदल्या दिवशी रात्रीची एक कहाणी सांगायची राहुन गेली. रात्री नेहमीप्रमाणे सचिन दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम आम्हांला समजावून सांगत होता. त्यात पहिला क्रमांक होता हनुमान मंदिराचा आणि मग झु अर्थात प्राणी संग्रहालयाचा! बोलता बोलता सचिन म्हणाला की ह्या प्राणी संग्रहालयापर्यंत पोहोचण्यासाठी जवळजवळ २ किमी अंतराचा चढणीचा रस्ता आहे. हे ऐकुन आमच्या बसमधील काहीजणांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं. ह्या चढणीवरील झुपेक्षा दुसरा एको केव्स (Eco Caves) चा पर्याय बसमधील काही जणांना पसंद होता.
ह्यावरून मग एक वैचारिक चर्चासत्र झालं. "ठरलेल्या कार्यक्रमापेक्षा जर वेगळे ठिकाण घ्यायचं असेल तर मला मुख्य ऑफिसातून परवानगी घ्यावी लागेल आणि तुम्हां सर्वांना एक लेखी निवेदन द्यावं लागेल!" नियमाला बांधलेल्या सचिनने आपली भुमिका स्पष्ट केली.
http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_30.html
Tuesday, April 26, 2016
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ५
http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_20.html
आधीच्या चार पोस्ट्सना चांगला प्रतिसाद! आमच्या सहलीच्या मंडळींचा whatsapp ग्रुप. त्यातील महिला मंडळीनी प्राजक्ताने काढलेल्या फोटोसाठी वेगळी खास प्रतिक्रिया दिली. धन्यवाद मंडळी! हा whatsapp ग्रुप बराच सक्रिय आहे आणि त्यावर बरीच उदबोधक चर्चा सुरु असते.
आम्ही थकलेभागले जीव रात्री त्या हेरिटेज हॉटेलात शांतपणे झोपलो होतो. थंडी बऱ्यापैकी होती. गाढ झोपेत असताना अचानक फोनची बेल वाजली. अंधार किट्ट होता. त्यामुळे फोन नक्की कुठाय हे शोधायलाच प्राजक्ताला थोडा वेळ लागला. किरकिर वाजणारी लाकडी फरशी, रात्रभर चालु ठेवावा लागणारा गीझर ह्यामुळे काहीतरी संशयास्पद वातावरण वाटत होते.
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ४
http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_17.html
सकाळी साडेपाचला उठुन बॅग्स भरण्यात मोलाची भुमिका बजावली. सोहम सातला उठला आणि साडेसातपर्यंत आम्ही सर्व बॅग्स खोलीबाहेर काढून नाष्ट्याला हजर झालो. उपमा, वेज सैंडविच, बटाटावडा वगैरे पदार्थ आमच्या पाहुणचारासाठी हजर होते. इथे खिदमतीला हजर होते असा शब्दप्रयोग करण्याचा मोह होत आहे. बसने हरिद्वारच्या दिशेने ८:१० च्या सुमारास प्रस्थान केलं. मसुरीला येण्याचा हाच रस्ता असल्याने निसर्गदृश्यांमध्ये काहीसा तोचतोचपणा आला होता.
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ३
सकाळ अगदी प्रसन्न होती. रुमच्या खिडकीतुन सुंदर नजारा खुणावत होता.
Saturday, April 9, 2016
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस २
http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_9.html
सहा वाजताचा वेक अप कॉल म्हणजे दारावर ठकठक! तोवर मी सवयीनुसार उठून जागा होतो. आज हे हॉटेल सोडायचं असल्याने सकाळी सातला बॅग्स बाहेर काढणे आवश्यक होते. आमच्याकडे Roles and Responsibility अगदी चांगल्या प्रकारे ठरविल्या गेल्या आहेत. त्यामुळे बॅगा भरल्या जात असताना मी मदतनिसाची भुमिका अगदी चांगल्या प्रकारे बजावीत होतो. सात वाजुन पाच मिनिटांनी सर्व बॅग्स भरुन खोलीबाहेर काढल्या आणि मी धन्य झालो. काल रात्री गंगाघाटावर स्नान केलं नव्हतं. पण आज सकाळी हॉटेलात आलेल्या गंगेच्या पाण्याने स्नान करून गंगास्नानाचे पुण्य आम्ही पदरात पाडून घेतलं.
http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_9.html
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस १
http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post.html
"केल्याने पर्यटन अंगी येते शहाणपण" असं म्हणायची पुर्वी पद्धत होती. तो काळ वेगळा होता. हल्ली लोक त्यांच्या लहानपणापासुनच अंगी शहाणपण बाळगुन असतात त्यामुळे केवळ ह्या कारणास्तव पर्यटन करण्याची प्रथा मागे पडत चालली आहे. स्वतंत्रपणे प्रवास करायचा की कोण्या पर्यटन कंपनीसोबत करायचा ह्या गोष्टीवर बराच उहापोह केल्यानंतर ह्या सहलीला वीणा वर्ल्ड तर्फे जायचं असा आमच्या घरी सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. आता घरच्या बाबतीत सर्वानुमते घेतले जाणारे निर्णय म्हणजे नक्की काय ह्याबाबत जास्त खोलात जायचं कारण नाही मंडळी!
http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post.html
Wednesday, March 23, 2016
Substance Vs Style
Substance Vs Style
हल्लीच व्यावसायिक जीवन म्हणा की वैयक्तिक जीवन! प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला अनेक कंगोरे असणं आवश्यक बनलं आहे. कारण आपल्या जीवनात ज्या ज्या लोकांशी संपर्क येतो त्या सर्वांशी चांगल्या वागणुकीची एक विशिष्ट पातळी ठेवणं आवश्यक आहे. नाहीतर होतं काय की लोक तुम्हांला तोंडावर काही बोलत नाहीत पण हळुहळू तुम्हांला ते टाळत जातात आणि मग तुम्ही मागे पडत जातात. पुर्वी असं नव्हतं. एखादा विद्वान माणुस सर्वांशी किंवा अगदी आपल्या पत्नीशी सुद्धा तुसडेपणाने वागला तरी ते खपुन जायचं किंबहुना जितका माणुस जास्त विद्वान तितका तो जास्त तऱ्हेवाईकपणे वागणार अशीच लोकांची अप्रत्यक्ष समजुत होती.
Sunday, March 20, 2016
परीक्षेचे दिवस !
http://patil2011.blogspot.in/2016/03/blog-post_19.html
सालाबादप्रमाणे सध्या परीक्षेचे दिवस सुरु आहेत. आणि नेहमीप्रमाणे सध्याच्या चुका लक्षात घेता पुढील वर्षी कसा सुधारित पद्धतीने अभ्यास करायचा ह्याची जोरदार चर्चा घरोघरी सुरु असेल. त्या निम्मित आजची ही पोस्ट!
सर्वसाधारण परीक्षा देणारा विद्यार्थी विचारात घेता त्या घटनेमध्ये खालील घटक येतात. १> ज्ञानस्त्रोत - ह्यात पुस्तके आणि नोटस (वह्या) ह्यांचा समावेश होतो. पुस्तकांमध्ये परीक्षेच्या दृष्टीने १०० टक्के ज्ञान असते. नोटस मध्ये पुस्तकांतील महत्त्वाचा भाग समाविष्ट केला गेला असतो.
साध्या परीक्षांमध्ये नोटसच्या आधारे पुर्ण गुण मिळवता येतात. पण जसजशी परीक्षांची क्लिष्टता वाढत जाते तसतसे पुर्ण गुण मिळविण्यासाठी पुस्तकांचे वाचन अपरिहार्य बनतं.
http://patil2011.blogspot.in/2016/03/blog-post_19.html
Tuesday, March 15, 2016
व्यापक दृष्टीकोन!
व्यावसायिक जीवनात एखाद्या प्रश्नाचे विश्लेषण करण्यासाठी Tops Down आणि Bottoms Up अशा दोन पद्धती अवलंबिल्या जातात. Tops Down पद्धतीत सर्वसमावेशक चित्रापासून विश्लेषणास सुरुवात करून मग हळुहळू आपण एका विशिष्ट भागापर्यंत पोहोचतो. ह्याउलट Bottoms Up ह्या पद्धतीत आपण एका विशिष्ट छोट्या भागापासुन सुरुवात करून त्या प्रश्नाच्या व्यापक भागाकडे पोहोचतो.
हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यात अंतराळात वर्षभर राहुन परतलेल्या स्कॉट केली ह्याने अंतराळातून जी प्रतिमा घेतली त्यात आशियावरील प्रदुषण अंतराळातून अगदी स्पष्टपणे दिसत असल्याचे नमुद केले आणि ते छायाचित्रसुद्धा प्रसिद्ध केले. हा झाला Tops Down दृष्टीकोन. आपल्याला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांची अशी Tops Down दृष्टीकोनातून सामोरी येणारी प्रतिमा
http://patil2011.blogspot.in/2016/03/blog-post_15.html
Thursday, March 10, 2016
जागतिक महिला दिन!
http://patil2011.blogspot.in/2016/03/blog-post.html
आज ८ मार्च - जागतिक महिला दिवस! आज सकाळपासुन ह्या संदर्भात विविध संदेश येऊ लागलेत. सर्व संदेशातील मुद्दे अगदी मान्य! घरच्या जबाबदाऱ्या सांभाळुन व्यावसायिक जबाबदाऱ्या सुद्धा यशस्वीपणे सांभाळणारी स्त्री नक्कीच कौतुकास पात्र आहे. पण ह्या सर्वांना दुसरी बाजू सुद्धा आहे. ह्या सर्वाची सुरुवात झाली ती कार्यालयात! Diversity च्या नावाखाली स्त्रियांना कार्यालयात समान संधी उपलब्ध करून द्याव्यात असा जो उपक्रम चालवला जातो त्या बाबतीत काही स्त्री व्यवस्थापकांनी नाराजी व्यक्त केली.
http://patil2011.blogspot.in/2016/03/blog-post.html
Friday, March 4, 2016
Manu's Farm House Wedding!!
आमच्या
लाडक्या मनुचा शुभविवाह रविवारी पार पडला. हा समारंभ अनेक बाबतीत
सद्यकालीन विवाहांपेक्षा वेगळा ठरला. ह्या लग्नानिमित्त ही पोस्ट!
बऱ्याच वर्षांनी आमच्या घरी म्हणजे घरी आणि बाजुच्या वाडीमध्ये लग्नसमारंभ पार पडला. १९९३ साली आमच्या घरी कुटुंबातील ह्या आधीचे लग्न झाले होते. त्यानंतर आमच्या कुटुंबियांचा गोतावळा वाढत गेला पण मनुष्यबळ त्या प्रमाणात वाढलं नाही. त्यामुळे लग्नसमारंभ हॉलवर करण्याचे प्रमाण वाढलं. पण मनुने मात्र वाडीतच लग्न करण्याचा मानस व्यक्त केला. आम्ही सर्वांनी मनुचा हा विचार उचलून धरला.
आमच्या समाजातील रितीप्रमाणे आदल्या दिवशी मुहुर्त, काकण वगैरे विधी शनिवारी पार पडले. ह्या आदल्या दिवशीच्या रितींना प्रामुख्याने गावातील मंडळी हजर असतात.गावातील मंडळी ही ह्या रितींच्या बाबतीत अगदी तज्ञ असतात. त्यामुळे चुकून एखाद्या रितीमध्ये आपलं काही काम आल्यास निमुटपणे त्यांचं ऐकण्यात हित असतं.
http://patil2011.blogspot.in/2016/03/manus-farm-wedding.html
बऱ्याच वर्षांनी आमच्या घरी म्हणजे घरी आणि बाजुच्या वाडीमध्ये लग्नसमारंभ पार पडला. १९९३ साली आमच्या घरी कुटुंबातील ह्या आधीचे लग्न झाले होते. त्यानंतर आमच्या कुटुंबियांचा गोतावळा वाढत गेला पण मनुष्यबळ त्या प्रमाणात वाढलं नाही. त्यामुळे लग्नसमारंभ हॉलवर करण्याचे प्रमाण वाढलं. पण मनुने मात्र वाडीतच लग्न करण्याचा मानस व्यक्त केला. आम्ही सर्वांनी मनुचा हा विचार उचलून धरला.
आमच्या समाजातील रितीप्रमाणे आदल्या दिवशी मुहुर्त, काकण वगैरे विधी शनिवारी पार पडले. ह्या आदल्या दिवशीच्या रितींना प्रामुख्याने गावातील मंडळी हजर असतात.गावातील मंडळी ही ह्या रितींच्या बाबतीत अगदी तज्ञ असतात. त्यामुळे चुकून एखाद्या रितीमध्ये आपलं काही काम आल्यास निमुटपणे त्यांचं ऐकण्यात हित असतं.
http://patil2011.blogspot.in/2016/03/manus-farm-wedding.html
Subscribe to:
Posts (Atom)






