Tuesday, July 2, 2019

असुनी भोवताली सारे!





गेल्या आठवड्यात बालपणीचा एक खास मित्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आम्हां सर्वांचा कायमचा निरोप घेऊन स्वर्गवासी झाला.  गेल्या एका वर्षात चाळीस-पंचेचाळीस वयोगटात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक सर्वांना सोडून गेलेला हा माझ्या माहितीतील पाचवा तरुण! 

हे काही वय नाही जिथं अशा आजाराने या भूतलावरील यात्रा अचानक संपवावी! हे असं वय जिथं मागची आणि पुढची अशा दोन्ही पिढ्या तुमच्यावर अवलंबून असतात. अशावेळी या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर किती मोठा आघात झाला असेल, ईश्वर त्यांना ह्या परिस्थितीतून उभं राहण्याची कशी काय शक्ती देत असेल ह्याचा विचार सुद्धा करवत नाही!  आजची ही पोस्ट दोन भागात विभागली गेली आहे. 

How is my life treating me?

अशा दुर्दैवी घटनांनंतर त्या टाळता येण्यासाठी ह्या व्यक्तींना कोणती काळजी घेता आली असती, किंबहुना ह्या वयोगटातील सर्वांना कोणती काळजी घेता येण्यासारखी आहे याविषयी प्रत्येकजण हिरीरीने आपली मते मांडत असतो.  त्यानं नियमित व्यायाम करायला हवा होता, आहाराबाबत शिस्त बाळगायला पाहिजे होती, नियमित विश्रांती घ्यायला हवी होती, मद्यपान आटोक्यात ठेवायला हवं होतं वगैरे वगैरे!

हल्ली मला या सल्ल्यांविषयी काही बोलावेसं वाटत नाही. इथं माझं एकच म्हणणं आहे ते म्हणजे तुमचं आयुष्य तुम्हाला कसं वागवत आहे ही गोष्ट फारशी तुमच्या नियंत्रणात नाही!  तुमच्या दैनंदिन नोकरीच्या प्रवासात तुम्हांला किती कष्ट सहन करावे लागतात,  तुमच्या नोकरी-व्यवसायात तुम्ही किती प्रमाणात स्थिरावला आहात, तुमच्या कौटुंबिक जीवनात किती शांतता आहे हे सारे घटक तुम्ही कितीही प्रामाणिक प्रयत्न केले तरी बऱ्याच अंशी तुमच्या नियंत्रणापलीकडे असतात! 

त्यामुळे नियमित / शिस्तीचा आहार, नियमित व्यायाम,  विश्रांती हे सर्व घटक जणू काही चैनीच्या बाबी आहेत असं वाटावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . त्यामुळे दुसऱ्या कोणाची परिस्थिती नक्की कशी आहे हे माहीत नसेल तर सहसा त्याविषयी टिप्पणी करू नये.  अजुन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एखादा मित्र खरोखर अडचणीत असेल तर त्याला प्रत्यक्ष व्यावहारिकदृष्ट्या अथवा भावनिकदृष्ट्यासुद्धा आधार देण्याची खरोखरीची तयारी कितीजण दाखवतात?  त्यामुळे जणू काही प्रत्येकजण आपला आयुष्याचा लढा एकट्यानेच लढत असतो असे वाटावं ही परिस्थिती निर्माण झाली आहे !!

Have we lost our sensitivity / empathy altogether?
अजुन एक मुद्दा म्हणजे आपल्या समाजाची झपाट्याने ऱ्हास पावत चाललेली संवेदनशीलता! जी व्यक्ती आपल्यासोबत लहानाची मोठी झाली ती व्यक्ती आपल्याला अचानक सोडून गेल्यावर तिचे अंतिम दर्शन घ्यायला आपल्यातील किती जण जातात हासुद्धा कळीचा मुद्दा!  याबाबतीत मी सुद्धा मोठ्या प्रमाणावर दोषी आहे! 

सोशल मीडियामधील ग्रुपवर,  मग तो फेसबुक वा व्हाट्सअप वरील असो;  ज्या ग्रुपवर ही व्यक्ती आपल्यासोबत सदस्य होती तिथं या व्यक्तीच्या निधनानंतर काही काळ तरी विनोद अथवा फुकाचे फॉरवर्ड करु नयेत इतकी तरी संवेदनशीलता आपण दाखवावी अशा मताचा मी होतो! परंतु हल्ली अगदी दुसर्‍या दिवसापासून या संवेदनशीलतेचा अंत झाल्याचे दिसून येते! 

कालाय तस्मै नमः !!

Friday, June 14, 2019

युवराज - नियतीला पडलेलं एक सुंदर स्वप्न!

माझ्या नियमित ब्लॉगची लिंक  साधं सुधं!! साधं सुधं!!



कलाक्रीडा क्षेत्रामध्ये दोन प्रकारचे कलाकार, क्रीडापटू असतात! पहिल्या प्रकारातील मंडळी ही चाकोरीबद्ध मार्गाने,  महत्प्रयासाने आपली कला अथवा क्रीडाकृत्ये पार पडत असतात.  यामध्ये कर्तव्यपुर्ती करणे हा एक महत्त्वाचा भाग असतो.  त्यामुळे होतं काय की ह्या कलेचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांना अथवा रसिकांना ह्या सादरीकरणातुन दिलखुलास आनंद मिळण्याची शक्यता कमी असते.  दुसऱ्या प्रकारातील कला-क्रीडाकार हे आपल्या मनाचे राजे असतात! कलंदर असतात! दुनियेनं आखुन दिलेल्या रितीप्रमाणे आपलं आयुष्य जगणं, आपली कला सादर करणे त्यांना मंजूर नसतं!  आपली कला, क्रीडा ते आपल्या मर्जीनुसारच रसिकांसमोर सादर करीत असतात.  मात्र जेव्हा केव्हा त्यांची भट्टी जुळून येते त्यावेळी त्यांनी सादर केलेला नजराणा हा रसिकांच्या मनात कायमचा घर करुन बसतो! असाच एक मनस्वी खेळाडु युवराज सिंग!! 

युवराज या आठवड्याच्या सुरुवातीला अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर करता झाला! माझा भावनाविवश होणारा मित्र राकेश याचा मला निरोप आला युवराजवर जमेल तितकं लिही!! माझ्या मनातही थोड्याफार प्रमाणात विषय हा विचार खूप घोळत होताच! राकेशनं सांगताच त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. 

युवराजने अचानक निवृत्ती घेतली असावी का? मला तरी नाही वाटत.  ज्या संघाविरुद्ध खेळताना तो पेटुन उठायचा,  त्याच्या डोळ्यांमध्ये ती चमक भरलेली दिसायची,  त्या ऑस्ट्रेलिया संघाचा भारताने आदल्या दिवशी विश्वचषक स्पर्धेच्या एका चित्तथरारक लढतीमध्ये पराभव केला होता. बहुधा त्या विजयाने तृप्त होऊनच युवराजने आपली निवृत्ती जाहीर केली असावी हा माझा सिद्धांत!  

माझं मन बरेच वर्षे मागे गेलं.  ते २००० साल होतं. मी इंग्लंडमध्ये असताना केनियामध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली जात होती.  तिथं विशीसुद्धा न गाठलेला,  (मिसरुड सुद्धा पुर्ण न फुटलेला ! हा मराठीतील आवडता शब्दप्रयोग !)  एक पंजाबी युवक भारतातर्फे आपले पदार्पण करीत होता.  आपल्या पहिल्याच सामन्यात त्यानं एका दिलखुलास खेळीचा नजराणा भारतीय प्रेक्षकांसमोर पेश केला.  त्याची ८४ धावांची ही खेळी भारताला ऑस्ट्रेलियावर विजय मिळून दिली गेली! एका युवराजाचे आगमन झाले होते!! बाकी काही महिन्याची मैत्री असलेले माझे इंग्लिश मित्र युवराजने त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानं त्याच्यावर बेहद खुश होते !

नावाने युवराज असला तरी त्याच्या आयुष्याची पटकथा काही एखाद्या सिनेमातील काल्पनिक राजकुमाराच्या जीवनकथेसारखी आनंदभरी नव्हती.  बहुदा त्यामध्ये दुःखाचे क्षणच अधिक पेरलेले असावेत.  त्याच्या आयुष्यात लहानपणापासूनच नियतीने संघर्षाच्या क्षणांची पेरणी केली होती.  बालपणात केव्हातरी आई-वडिलांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.  युवराज आपल्या आईसोबत राहू लागला.  खरंतर वडील भारतातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले खेळाडू !परंतु युवराजने मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे त्यांचा आणि युवराजचा अबोला अनेक वर्षे टिकून राहिला.  ते बहुदा खूप कडक असावेत.  क्रिकेट सोडून बाकी कोणताही खेळ युवराज ने खेळावा हे त्यांना मंजूर नव्हते, मित्रमंडळींबरोबर जास्त भटकणे सुद्धा त्यांना खपत नसावे.  या सर्वांमुळे कुठेतरी हा युवराज आपल्या वडिलांपासून मनानं आणि संगतीने दुरावला गेला. गेल्या आठवड्यात त्याच्या आईच्या मुलाखतीची काही क्षणचित्रे पाहायला मिळाली. त्यात युवराज फलंदाजीला आला की मी प्रत्यक्ष त्याची फलंदाजाची पहात नाही असं ती म्हणाली !  कारण मी जर त्याची फलंदाजी पाहायला लागले तो तात्काळ बाद होतो अशी त्या भोळ्या माऊलीची भाबडी समजूत!!

२००० सालच्या त्या स्वप्नवत आगमनानंतरसुद्धा युवराज भारतीय संघात कायमचा स्थिरावला असे नाही.  एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याचे स्थान जरी बऱ्यापैकी पक्के असले तरी कसोटी संघात मात्र त्याला सुरुवातीच्या काळात क्वचितच स्थान मिळाले.  मुलाखतीत बोलताना त्यानं ह्याचा उल्लेख केला.  त्यावेळच्या संघाच्या मधल्या फळीत राहुल, सचिन, गांगुली, लक्ष्मण यांच्यासारखे रथी-महारथी होते. त्यामुळे यातील कोणी दुखापतग्रस्त झाला तरच बाकीच्यांना संधी मिळायची.   ऐन उमेदीच्या काळात त्याला कसोटी संघाबाहेर राहावं लागलं.  

कालांतराने T20 प्रकारानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चंचूप्रवेश करून विविध आंतरराष्ट्रीय लीगद्वारे चांगलंच बस्तान बसविले.  २००७  सालच्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेतील दारुण पराभवानंतर भारतीय संघ लगेचच तीन-चार महिन्यांनी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या T20 सलामीच्या विश्वचषक स्पर्धेसाठी गेला होता.  एका विसरण्याजोग्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेनंतर या T20 विश्वचषक स्पर्धेत मात्र भारतानं अविस्मरणीय कामगिरी करत ह्या चषकावर आपले नाव कोरले.  या सर्व स्पर्धेत लक्षात राहण्यासारखा क्षण म्हणजे स्टुअर्ट ब्रॉडला युवराजने एका षटकांमध्ये ठोकलेले सहा षटकार!  आणि ह्याला कारणीभूत ठरलं ते इंग्लंडच्या एका खेळाडूनं या षटकाआधी युवराजला डिवचणं! या देखण्या पंजाबी तरुणाचे रक्त खवळले की काय होऊ शकतो याचा पुरावा साऱ्या विश्वाने त्यादिवशी अनुभवला.  भारताने हा सामना आणि मग त्या पुढे विश्वचषक स्पर्धा देखील जिंकली! 

२००८ साली आयपीएलचे भारतात आगमन झाले.  युवराज पंजाब किंग्स इलेव्हनतर्फे अधुनमधुन धमाकेदार खेळ्या खेळत राहिला! मग आली ती  २०११ साली भारतात आयोजित केली गेलेली विश्वचषक स्पर्धा! या स्पर्धेत युवराज पुर्ण बहरामध्ये होता! फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांमध्ये त्याने आपल्या कर्तुत्वाची झलक दाखवत या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेँट हा किताब पटकावला! भारताला विश्वचषक स्पर्धा जिंकून देण्यात त्यानं मोलाचा वाटा दिला! त्यानंतर कसोटीतील मधल्या फळीतील ते चार दिग्गज एकामागून एक निवृत्त होत गेले. मधल्या फळीतील काही जागा रिकाम्या झाल्या.  परंतु सरासरीकडे लक्ष देत शिस्तबद्ध खेळ खेळण्याची सवय युवराजला कधीच अंगवळणी पडली नाही.  तो आपली जिंदगी जगला तो आपल्या मर्जीने! 

या आठवड्यात मुलाखतीत तो म्हणाला सुद्धा! "या कालावधीत माझी कसोटी सरासरी ही सदैव तीस-पस्तीसच्या आसपास घोटाळत राहिली! काश मलाही सरासरी पन्नाशीच्या आसपास नेता आली असती तर!!"  या सुमारासच नियतीने या युवराजच्या आयुष्याच्या कथेमध्ये एक एका कष्टदायी पर्वाची पेरणी केली होती.  या जिंदादिल पंजाबी युवकाला कर्करोगाने ग्रासले होते.  ही बातमी जाहीर होताच अवघा भारत हळहळला! परंतु हा युवराज कर्करोगासारख्या असाध्य रोगाला हार मानणाऱ्यातला नव्हता.  त्यानं  मोठ्या जिद्दीनं  या कर्करोगाला तोंड दिलं  आणि विजयी होऊनच तो बाहेर पडला. अमेरिकेतील इंडियानापोलिस येथे हे कर्करोगावर उपचार घेत असताना आपल्या मनस्थितीविषयी तो मुलाखतीत बोलत होता. अनिल कुंबळे म्हणाला की तिथं सुद्धा तो आपल्या या आधीच्या खेळांच्या चित्रफिती पहात होता.  बरं झालं की की पुन्हा एकदा पुनरागमन दणक्यात साजरं करायचं याची स्वप्न पाहत होता. या पठ्ठ्याने हे हे साध्य केलं सुद्धा! 

जरी त्याला आंतरराष्ट्रीय खेळामध्ये ते पुन्हा आपलं स्थान पक्क करता आलं नाही तरी तो आयपीएलमध्ये धडाकेबाज खेळ्या करत राहिला. यावर्षी मात्र सुरुवातीला त्याला कोणत्याच फ्रॅन्चाइसीने  आपल्या संघांमध्ये घेण्यास फारसा रस दाखवला नाही.  शेवटी मुंबई इंडियन्सने  त्याला एक करोड या किमतीवर आपल्या संघात घेतलं. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये तो खेळला देखील!  परंतु तो सुरुवातीचा जोष, ती चमक कुठेतरी हरवली होती! हे जसं क्रिकेट रसिकांना समजलं तसं किंबहुना त्याहून आधीच युवराजला सुद्धा जाणवलं होतं.  एका मानी माणसाला आपल्या उतरणीला लागलेल्या कलेचं  सर्व जगासमोर प्रदर्शन करणं कदाचित खूपच जिव्हारी लागलं असावं! म्हणूनच त्यांना सन्मानपूर्वक निवृत्ती घेणे पत्कारला असावं !

युवराजने  मध्यंतरीच्या काळात विवाह केला आहे.  आता त्याचे वडिलांशी संबंधसुद्धा सुधारले आहेत! "क्रिकेटला देण्यासाठी माझ्याकडे अजून बरंच काही आहे.  मी आत्ताच निवृत्त झालो आहे.  काही काळ थोडी विश्रांती घेऊन मी कोणत्या ना कोणत्या रुपात तरी क्रिकेटला माझे योगदान देणे सुरू ठेवीन!"  युवराज म्हणाला!! आम्ही सर्व क्रिकेट रसिक त्याची आतुरतेने वाट पाहू!!

युवराज तु कायमचा लक्षात राहशील ते तुझ्या मैदानावरील राजेशाही वावरण्यामुळं,   गोलंदाजाने टाकलेला चेंडू येताना तुझ्या त्या डोळ्यातील  दिसणाऱ्या चमकीमुळे आणि एखादा षटकार ठोकतानादेखील चित्रकाराने आपल्या कुंचल्याचा एक हळुवार फटकारा मारावा त्याप्रमाणं जाणवणाऱ्या त्या नजाकतीमुळे!! 

युवराज लौकिकार्थानं जरी तुला महाराज बनता आलं नसलं तरी आम्हां साऱ्या क्रीडा रसिकांच्या हृदयावर मात्र तू नक्कीच साम्राज्य गाजवलं आणि गाजत राहशील! आयुष्यातील तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला आम्हां सर्वांच्या मनःपुर्वक शुभेच्छा !!

Tuesday, June 4, 2019

सहकुटुंब सहभोजन !



काल निरर्थकपणे टीव्हीवर वाहिन्यांवर सर्फिंग करत असताना मी एका हॉलीवुड चित्रपटावर स्थिरावलो.  काही वेळानं तिथं एका कुटुंबाच्या सहभोजनाचा आनंददायी प्रसंग पहावयास मिळाला. एक आनंदी कुटुंब समोर ठेवलेल्या नानाविध चविष्ट पदार्थांनी युक्त अशा मेजवानीचा आस्वाद घेत होतं. वातावरण अत्यंत खेळीमेळीचं होतं.  आजोबा, आजी, त्यांची मुलं, नातवंडं अशी विविध वयोगटातील आनंदी माणसं एकत्रपणे त्या सणाच्या दिवशी मेजवानीचा आनंद लुटत होती.  पारंपरिक अमेरिकन कुटुंबात असा प्रसंग थँक्स गिविंग्जच्या दिवशी अनुभवायला मिळतो.  

हॉलिवूड चित्रपटात इटालियन, मेक्सिकन कुटुंबातसुद्धा अशा मेजवानीचा आनंद एकत्रपणे लुटणाऱ्या कुटुंबांचे चित्रीकरण आपल्याला आढळते.  आपल्याकडे सुद्धा अशा आनंदी प्रसंगाचं चित्रपटात केलेलं चित्रण आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळाला आहे.  "हम साथ साथ है",  "हम आपके है कौन!"  अशा सुरज बडजात्या निर्मित लांबलचक वाक्यभर शीर्षक असलेल्या चित्रपटात असे प्रसंग हमखास असु शकतात.  ह्या कुटुंबासोबत त्यांना त्यांच्या ताटात आग्रहाने विविध स्वादिष्ट पदार्थ वाढणारे त्यांचे वर्षानुवर्षे असणारे सेवकसुद्धा आपल्याला आढळतात. परंतु या व्यक्तींना नोकर म्हणून अजिबात संबोधले जात नाही, कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच त्यांना प्रेमाची वागणूक दिली जाते.  मराठी चित्रपटात, बकेटलिस्टमध्ये सुद्धा फारशा मोठ्या नव्हे परंतु एकत्र जेवणाऱ्या कुटुंबाचे चित्रण आढळते.  इथं फरक असा की माधुरी एकच भाजी मसाले आणि विविध जिन्नसांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमधुन बनवताना आपल्याला आढळते.  इथं  नोकरवर्गाची उपस्थिती आपल्याला जाणवत नाही. 

चित्रपटातील कुटुंबाची एकत्रित जेवण घेण्याचे हे प्रसंग आपलं लक्ष मराठी कुटुंबातील एकत्र जेवणाच्या कालपरत्वे दुर्मिळ होत चाललेल्या परंपरेकडे वेधून घेतात. पुर्वी ज्याकाळी लोकांचे शिक्षण, व्यवसाय हे आवाक्यात होते, त्यावेळी सायंकाळच्या जेवणास लोक सर्व कुटुंबातील सदस्य घरी उपस्थित असत व एकत्रपणे जेवण घेणे हे काहीसे बंधनकारक असायचे. तिथं बहुदा कुटुंबप्रमुख अत्यंत गंभीर चेहरा करून बसत असावा.  आपल्याकडून कोणत्याही पदार्थांमध्ये त्रुटी तर राहिली नाही या शंकेने आणि त्याप्रती निर्माण झालेल्या भयाने वावरणारी गृहिणीसुद्धा असायची. कुटुंबातील बालकवर्ग आपण दिवसातील केलेल्या अनेक प्रमादांपैकी कोणता प्रमाद आपल्याला इथं बोलणी खायला लावु शकेल ह्याची भिती बाळगुन असावा.  एकंदरीत काहीसे भयप्रद वातावरण या जेवणाच्या टेबलावर असावे असा मला संशय आहे. 

कालांतराने लोकांच्या शाळा-कॉलेजांच्या आणि नोकरीच्या वेळा बदलल्या.  त्यामुळे दैनंदिन जीवनात एकत्र जेवणाला बसण्याची वेळ क्वचितच येऊ लागली.  सुसंवादाची एक हुकलेली संधी या एका चांगल्या परंपरेला हळूहळू तिलांजली देण्यास कारणीभूत ठरू लागली.  एकत्र जेवण घेण्याची सवय दैनंदिन जीवनात सुटल्याने सुट्टीच्या दिवशीसुद्धा शक्य असुनसुद्धा संपुर्ण कुटुंब एकत्रितपणे जेवणाचा आनंद घेताना दिसत नाही.  

यामागे नक्की कारणे काय असावीत? सद्यकालीन जगाच्या बहुतेक समस्यांमागे मोबाईलचा अतिवापर हे कारण असावे असं विधान सरसकटपणे केलं जातं. या धर्तीवर या परिस्थितीला म्हणजेच एकत्रितपणे कुटुंबाने जेवण न घेण्याच्या समस्येला मोबाईलचा अतिवापर काही प्रमाणात कारणीभूत आहे असे ढोबळमानाने विधान आपण करू शकतो.  परंतु या समस्येकडे काहीसे खोलवर जाऊन बघण्याची गरज आहे. एखाद्या प्रसंगात,  समारंभात व्यक्ती का सहभागी होते ह्याचं मुख्य कारण म्हणजे या सहभागामुळे काहीतरी एक आनंदी अनुभव मिळण्याची शक्यता त्या व्यक्तीला जाणवत असते! आता एकत्रित जेवण घेताना आनंदाचा कोणता अनुभव आपण सर्व व्यक्तींना मिळवून देत असतो हा प्रश्न सर्वांनी आपल्याला विचारणे आवश्यक आहे.  

कुटुंबप्रमुखाच्या दृष्टिकोनातून आपलं संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवण घेत आहेत ही बाब आनंद देऊ शकते.  गृहिणीच्या दृष्टिने आपण मनापासून केलेल्या जेवणाचा आनंद आपल्या सर्व प्रिय व्यक्ती एकत्रितपणे बसुन घेत आहेत ही एक आनंददायी भावना या अनुभवातून मिळू शकते. जेवणातील एखादा पदार्थाची भट्टी जराशी सुद्धा चुकली तरी जितक्या तत्परतेने सदस्य आपली प्रतिक्रिया नोंदवितात त्याच तत्परतेने भट्टी जमुन आलेल्या पदार्थाचं कौतुक सुद्धा करणं गृहिणीला मोठी स्फुर्ती देऊ शकतं !  कुटुंबातील मुलांच्या दृष्टीनं मात्र हा प्रसंग ह्या काळातसुद्धा बऱ्याच घरांत धोक्याची नांदी देणारा असतो.  आईवडील याप्रसंगी आपण केलेल्या चुकांचा पाढा आपल्यासमोर वाचून दाखवणार ही सुप्त भिती  त्यांच्या मनात असू शकते.  भोजनप्रसंगी टीव्ही चालू ठेवून भोजन करण्याची पद्धत असेल तर संवादाच्या शक्यतेला अजून एक अडथळा निर्माण होतो.  या सर्व घटकांमध्ये माझ्यामते तरी कुटुंब प्रमुखाची महत्त्वाची जबाबदारी आहे.  कुटूंबप्रमुख म्हणजे पुरुष असे मी  गृहीत धरले आहे.  आता या गृहीतकामुळे माझा निषेध होण्याची शक्यता आहे! गृहिणीने जेवणाआधीचे दोन ते तीन तास जेवण बनवण्यात घालविले असल्याने जेवण होईस्तोवर ती हुश्श म्हणून सुटकेचा निश्वास टाकत असते!  त्यामुळे एकत्रितपणे जेवण घेताना संवाद सुरू ठेवण्याची तिच्याकडून अपेक्षा करणे हे काहीसे चुकीचे ठरते.  तिचं लक्ष बऱ्याच प्रमाणात आपण बनविलेल्या पदार्थांना सर्वांचा प्रतिसाद कसा मिळत आहे याकडं लागण्याची शक्यता आहे! कुटुंबातील मुलं ही नवीन पिढीची प्रतिनिधी आहेत.  संवादाचा आरंभ आपणसुद्धा करू शकतो या संकल्पनेची नवीन पिढीला जाणीव नाही. त्यांच्या मते आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे ही इतकी संवादाची त्यांच्याकडून कुटुंबातील बाकीच्या सदस्यांची अपेक्षा असावी. त्यामुळे आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन ही मंडळी आपले लक्ष गॅझेटकडे वळवितात. अशावेळी त्यांना आणि गृहिणीला संवादात सहभागी करून घेण्यासाठी कुटुंब प्रमुखाने काहीतरी मनोरंजक विषय चर्चेसाठी घेणे आवश्यक आहे. चर्चेमध्ये हे बाकीच्या सदस्यांना त्यांची मते विचारणे, ते मते मांडत असताना त्यांच्याकडे लक्ष देणे अशा वर्तवणुकीची कुटुंबप्रमुखाकडून अपेक्षा आहे.  कालांतरानं बाकीची मंडळी सुद्धा ह्यात पुढाकार घेतील. कुटुंबातील सदस्यांमधील बंध अतूट ठेवण्यासाठी एकत्रितपणे भोजन करणे हा एक सहज उपलब्ध असणारा मार्ग आहे, ती आपली परंपरा आहे. तिचं पालन जमेल तितकं आपण करुयात हेच सांगणं !


Sunday, May 12, 2019

माझे विमानप्रवास - भाग १



माझे विमानप्रवास - भाग १

   "तु कठीण आहेस" एक मित्र कधीतरी कार्यालयीन जीवनात मला म्हणाला होता. लौकिकार्थाने अनावश्यक त्या गोष्टीची सखोल आकडेवारी बाळगण्याचा माझा असलेला छंद पाहून त्यानं हे विधान केले होते.  आजच्या या पोस्टच्या निमित्ताने त्या मित्राची आठवण झाली. आपण किती वेळा विमानात बसलो आहोत ही काही नोंद ठेवण्यासारखी गोष्ट नाही.  परंतु मी त्याची नोंद ठेवली आहे. आज एका रिकामटेकड्या रविवारी संध्याकाळी या पोस्टद्वारे माझ्या विमानउड्डाणाच्या आठवणीतील पहिलं पुष्प मी आपल्यासमोर ठेवत आहे. 

माझ्या आयुष्यातील सर्व विमानउड्डाणांची यादी खालीलप्रमाणे 

1. मुंबई बहारीन 
2. बहारीन लंडन  
3. लंडन दुबई 
4. दुबई मुंबई 
5. मुंबई चेन्नई 
6. चेन्नई मुंबई  


पुढे वाचा !

माझे विमानप्रवास - भाग १

Sunday, May 5, 2019

मुक्त निर्मितीचा महोत्सव



गंगाधर गाडगीळ ह्यांचं एका मुंगीचे महाभारत हे आत्मचरित्र वाचणं हे गेले दोन वर्षे माझ्या To Do List मध्ये आहे. आज काही वेळ मिळाल्यामुळे पुन्हा एकदा या पुस्तकाकडे आणि खास करुन मुक्त निर्मितीचा महोत्सव या प्रकरणाने माझे लक्ष वेधून घेतले.  या प्रकरणामध्ये गंगाधर गाडगीळ यांनी आपल्या या साहित्यनिर्मितीच्या प्रक्रियेविषयी एक विस्तृत असे विश्लेषण केलं आहे.  हा अत्यंत एक वाचनीय असा अनुभव आहे. मराठी भाषेतील एका नावाजलेल्या लेखकानं केलेला साहित्यनिर्मितीच्या प्रक्रियेचे हे अत्यंत अभ्यासपुर्ण विश्लेषण आहे.

पुढे वाचा 
https://patil2011.blogspot.com/2019/05/blog-post_4.html


Wednesday, May 1, 2019

महाराजा भोग

https://patil2011.blogspot.com/2019/05/blog-post.html?m=1

 

Wednesday, April 17, 2019

२०१९ - अमेरिकावारी - भाग १

Tuesday, April 9, 2019

२०१९ - अमेरिकावारी - भाग १



गेल्या आठवड्यात कार्यालयीन कामानिमित्त एक छोटी अमेरिका वारी झाली.  ही अमेरिका वारी बऱ्याच गोष्टींमुळे लक्षात राहण्यासारखी झाली.  कार्यालयीन बैठकी संस्मरणीय होतील हे म्हणण्याची वेळ तशी क्वचितच येते. परंतु यावेळची भेट मात्र त्याला अपवाद होती.  माहिती आणि तंत्रज्ञान विभागात काम करणारी लोक स्वतंत्रपणे काम एका विशिष्ट टप्प्यानंतरच करु शकतात. त्यांना त्यांच्या कामासाठी कोणीतरी ते विकसित करत असलेल्या आज्ञावलीच्या गरजा देणे आवश्यक असते. हे जे कोणीतरी असतात त्यांना बिझनेस असे म्हणण्याची प्रथा आहे.  

आठवड्यातील पहिले चार दिवस बिझनेस व माहिती आणि तंत्रज्ञान विभागांतील आम्ही लोक यांच्या बैठकींची शृंखला एका अद्ययावत कॉन्फरन्स रूममध्ये करण्यात आली होती. चौथ्या दिवशी ती कॉन्फरन्स रुम उपलब्ध नसल्यामुळे बैठकीची व्यवस्था वेस्टइन या हॉटेलात करण्यात आली. माहिती आणि तंत्रज्ञान विभागातील अमेरिकन मंडळीसुद्धा सतत भारतीयांच्या संपर्कात राहून त्यांचे काही प्रमाणात देशीकरण झाले आहे असं मला उगाचच गेले काही वर्ष वाटत आलं आहे. परंतु बिझनेस मात्र आपलं मूळ अमेरिकन रूप कायम ठेवून आहे. त्यामुळे अशा लोकांबरोबर चार दिवस व्यतीत करण्यात खरोखर आनंद वाटला. त्यातील काही लोकांची व्यक्तिमत्वे खरोखर भारदस्त होती. फिट अशी ही माणसं अगदी आकर्षक पद्धतीने व्यासपीठावर येऊन आपलं म्हणणं मांडत होती. जेवणाची व्यवस्थासुद्धा पूर्णपणे अमेरिकन पद्धतीने करण्यात आली होती.  त्यामुळे काही दिवशी तर सलाडवर दिवस काढण्याची आमच्यावर वेळ आली.  

ह्या भेटीतील काही मोजक्या फोटोंभोवती आजची ही पोस्ट गुंफण्यात आली आहे.   सुरुवातीला ब्रिटिश एअरवेजच्या बिझनेस क्लासने मुंबई ते लंडन आणि मग लंडन ते फिलाडेल्फिया असा प्रवास केला. ब्रिटिश एअरवेजचा बिझनेस क्लास इतकाच खास नाही. आपण बाजूच्या माणसाच्या जवळपास staring into face करत आहोत की काय अशा पद्धतीने यांच्या सीट्स आयोजित केलेल्या असतात. 



परंतु लंडनला असणाऱ्या गुजराती लोकांचे बाहुल्य लक्षात घेऊन इथं भारतीय पद्धतीचं जेवण मात्र अतिउत्तम मिळालं! लंडनला उतरल्यावर विमानात उद्घोषणा गुजरातीमध्ये सुद्धा करण्यात आल्या. 

बाकी अमेरिकन इमिग्रेशन ऑफिसरने यावेळेला मला चार प्रश्न विचारून माझ्या आधीच्या सर्व भेटीतील प्रश्नांच्या संख्येच्या बेरजेला आव्हान दिले.   त्यातच कस्टमवाल्यांनी सुद्धा मला अधिक तपासणीसाठी बाजूला घेतले.  कारण असे होते की माझ्या पुढील माणसाने त्याच्या बॅगमध्ये हे फळे आणली होती.  कस्टमवाल्याच्या कुत्र्याने जो एकदम गोंडस दिसत होता त्यानं ह्या माणसाला बरोबर पकडले होते. त्या माणसाबरोबर त्याचे कुटुंब होते आणि त्यांच्या मागे असलेल्या बहुदा मी त्यांच्याप्रमाणेच दिसत असल्यानं मला देखील त्यांच्यासोबत बाजूला घेण्यात आले. एकंदरीत प्रसंगात मला रस निर्माण झाल्यानं मी याविषयी फारसा निषेध नोंदवला नाही.  एप्रिलमधील हवामानसुद्धा बऱ्यापैकी थंड होते. सोमवारी बैठकीला जाताना भलत्या आत्मविश्वासाने मी जॅकेट न घालता गेलो.   मग 3-4 डिग्री सेल्सियस तापमानामध्ये ज्याला बोचऱ्या वाऱ्यांची साथ मिळत होती, माझे धाबे पूर्णपणे दणाणले. 

सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत रेंगाळत असणाऱ्या सूर्याने सुद्धा निळ्या आकाशात विविध रंगांची उधळण केली होती. 

यावेळच्या प्रवासात माझा jet-lag शेवटपर्यंत कायम राहिला. रात्री दहाला झोपो वा अकराला!! मला नियमितपणे एक ते दीडच्या सुमारास जाग येत राहिली. मग मी सकाळी सहा वाजेपर्यंत प्रत्येक तास घड्याळामध्ये कसा पुढे सरकतो याची शहानिशा करीत चार पाच रात्री जागून काढल्या. 
अशाच एका पहाटे साडेतीन वाजता पूर्णपणे हताश होऊन ऑफिसच्या कामाच्या नोट्स काढण्याचा निष्फळ प्रयत्न करणारे आदित्य पाटील!!


2002 पासून जे काही अमेरिकेत वर्षे घालवली होती त्या वास्तव्यामध्ये कॉस्को, टारगेट, मार्शल, wal-mart, कोल यासारख्या दुकानांसोबत काही भावनिक बंधन निर्माण झाले होते. या आठवड्यातील भेटीने या भावनिक बंधांना उजाळा मिळाला. परंतु भावनिक बंध कितीही असोत मी ह्या दुकानांमध्ये खरेदी मात्र किमान केली ! ह्या दुकानांत आवडलेल्या काही कलाकृतींची ही छायाचित्रे !



पाहता पाहता आठवडा  समाप्तीच्या मार्गाला लागला. पाचव्या दिवशी मात्र माहिती आणि तंत्रज्ञान विभागातील व्यवस्थापकांची बैठक झाली. त्यामध्ये आमच्या अमेरिकन ऑफिसमधील बहुतांश व्यवस्थापक होते. बिझनेस मंडळींनी आपल्या बैठकी चार वाजता आटोपल्या तर माहिती आणि तंत्रज्ञान बैठक मात्र शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालली. ही माझ्या भारतीयकरणाच्या मुद्द्याला दुजोरा बाब ! आकाश त्यावेळी मेघाच्छादित होते आणि पावसाच्या सरी देखील अधून मधून येत होत्या. या दिवशी सायंकाळी माझ्या आवडीच्या ऑलिव्ह गार्डन या इटालियन रेस्टॉरंट मध्ये आम्ही जेवण घेतले!

पहिल्यांदा अमेरिकेत आम्ही जेव्हा २००२ साली गेलो तेव्हा माझी  बहीण निऊ आणि तिचे यजमान निशांक हे अमेरिकेमध्ये होते. त्यानंतर काही काळ ते अमेरिकेत होते तर आम्ही नव्हतो. काही काळ आम्ही होतो तर ते नव्हते. तर काही काळ आम्ही सर्वजण होतो. परंतु आम्ही अमेरिकेत प्रत्यक्षात केव्हाही भेटलो नाही.  आता ते काही वर्षांपुर्वी परत अमेरिकेत वास्तव्यास गेले आहेत. ही संधी साधून यंदाच्या अमेरिका भेटीवेळी मी त्यांच्या डॅलस येथील घराला भेट देण्याचा बेत आखला. वेगवेगळ्या प्रकारची उड्डाणे तपासून पाहून सकाळी पाच वाजताचे अमेरिकन एअरलाइन्सचे फिलाडेल्फिया ते डॅलस हे विमान पकडण्याचे मी निश्चित केले होते. पाच वाजताचे विमान पकडण्यासाठी नक्की किती वाजता निघायचे हे ठरवणे जरा कठीणच होते. परंतु माझ्या अत्यंत सावध स्वभावाला अनुसरून मी दोन वाजताच उबेर करून फिलाडेल्फिया एअरपोर्टच्या दिशेने निघालो. परंतु तेथील बॅग्स चेकइन करणारे कर्मचारी मात्र सव्वातीन वाजल्याशिवाय येत नाहीत. त्यामुळे काही काळ माझा त्यांची प्रतीक्षा करण्यात व्यतीत करण्यात गेला. पुन्हा एकदा एका कष्टप्रद अशा सुरक्षा तपासणीला तोंड देऊन अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानात स्थानापन्न झालो! हे विमान आंतरराज्य विमानांच्या मानाने चांगलेच मोठे होते आणि फिलाडेल्फिया ते डल्लास हे कागदोपत्री पावणेचार तास दाखवणारे अंतर या विमानाने सव्वा तीन तासात पार पाडले. मला ह्या प्रवासात चक्क एक बिस्कीट पुडा, एक कोक आणि एक ऑरेंज जुस देण्यात येऊन जबरदस्त आदरातिथ्य करण्यात आले !

 गेले तीन वर्ष भारतात येऊन शकलेल्या निऊला मला पाहून गहिवरून आले.  त्यावेळचा हा फोटो!!  



निशांक आणि निऊ यांचे डल्लास येथील घर भव्य दिव्य असे आहे. 



सुरुवातीला आम्ही निऊच्या हातचा चविष्ट नाश्ता करून गप्पा मारत बसलो. रात्री केवळ दोन तास झोप झाली असल्यामुळे मी मध्येच एक तासभर झोप काढण्याचा प्रयत्न केला.  दुपारी मात्र पुन्हा एकदा आम्ही गप्पांना बसलो असताना बाहेर जाऊन येणे योग्य ठरेल असे निशांकने सुचविले. त्याच्या सल्ल्यानुसार आम्ही पुढील चार तासभर येथील बऱ्याच ठिकाणांना भेटी दिल्या.  या भेटीवर काहीतरी लिहायचे हे नक्की असल्यामुळे मी आयपॅड घेऊन सज्ज होतो.  मी कुठेही फोटो काढत होतो.  परंतु त्याची आगाऊ सूचना या सर्वांना दिल्यामुळं त्यांनी त्यावर फारसे आश्चर्य व्यक्त केले नाही.  सर्व जो माझा भाचा! त्याने माझा आयपॅड सांभाळण्यात अत्यंत मोलाचा वाटा उचलला. 
ह्या शहराची ही काही छायाचित्रे ! 

आठच्या आकड्याशी साधर्म्य दर्शविणारा हा उड्डाणपूल !!






आपण  एखाद्या गुढ प्रवासाला निघालो आहोत की काय असा भास निर्माण करणारा हा फोटो !!



निशांक यांच्या ऑफिसला सुद्धा आम्ही भेट दिली. या ऑफिसातून डल्लास शहराचे एक नयनरम्य असे दर्शन घडते. तिथं नियमित बैठकीसाठी असणाऱ्या रुमसोबत सुद्धा वेगळ्या विभागांची खास सोय केली करण्यात आली आहे. या विभागात सुद्धा आम्ही छायाचित्रण केले.  त्यानंतर आम्ही नव्याने उभारण्यात आलेल्या साईबाबा मंदिराकडे कूच केले.  


त्यावेळी मनुचा ऑस्ट्रेलियातून फोन आला. तिने गुढीपाडवा ते रामनवमी अशी नवरात्र केवळ शाकाहार करून व्यतीत करण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला. तिच्या या दृढनिश्चयावर आणि  एकंदरीत तिच्या पाक कलेवर मी संशय व्यक्त करण्याचे दुःसाहस केले!  त्याची शिक्षा म्हणून मला पुढील अर्ध्या तासात खास ऑस्ट्रेलियातून विविध पाककलेचे कौशल्य दर्शविणाऱ्या पदार्थांचे फोटो सादर करण्यात आले.  







(क्रमशः )

Saturday, February 9, 2019

ब्लॉगपोस्टचे वर्गीकरण

साधं सुधं आणि NES VASAI 1988 Batch ह्या दोन ब्लॉगवरील गेल्या आठ वर्षातील ब्लॉगपोस्टचे वर्गीकरण !! ह्यातील कोणत्याही पोस्टवर क्लिक करुन थेट त्या पोस्टवर आपण जाऊ शकता. 

Post Title Categoty
CBSE, ICSE वगैरे वगैरे!अभ्यास
अभ्यास पद्धतीअभ्यास
अभ्यास पद्धती भाग २अभ्यास
परीक्षामय - भाग १!अभ्यास
परीक्षामय - भाग २!अभ्यास
परीक्षेचे दिवस !अभ्यास
बारावी परीक्षा, जास्तीचा अर्धा तास, १० मिनिटे !अभ्यास
माझ्या मुलाचा अभ्यास!अभ्यास
मोकळा वेळ आणि अभियांत्रिकीअभ्यास
वाढता वाढता वाढे!अभ्यास
Asian Heart Institute - एक अनुभवअवती भोवती
Happy New Book Readingअवती भोवती
Starters ते Meddlers!!अवती भोवती
WhatsApp वर्गीकरणअवती भोवती
अगम्य , अज्ञात ...अवती भोवती
अनुल्लेख!अवती भोवती
अभिमन्यु सारेअवती भोवती
अमिताभ आणि रेखाचा एकत्र हवाईप्रवास - एक कल्पनाविलास!अवती भोवती
आँखों में हमने आप के सपने सजाये हैं!अवती भोवती
आत्मक्लेशअवती भोवती
आम्ही शिफ्ट होतोय !अवती भोवती
उदंड समीक्षक !अवती भोवती
एका शहराची अदृश्य बाजू !!अवती भोवती
कलम ३७७अवती भोवती
कलियुग म्हणजे काय हो भाऊ?अवती भोवती
कांदा, पेट्रोल, चेन्नई एक्स्प्रेस आणि टक्केवारी!अवती भोवती
कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या देवेंद्रा ?अवती भोवती
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार / फेररचनाअवती भोवती
खंत ५०१ ची!अवती भोवती
चलनगाथाअवती भोवती
जिया खान आणि बालवयातील प्रसिद्धी / यशअवती भोवती
दडलेले प्राणी पक्षी !अवती भोवती
देशमुखांचं पोर!अवती भोवती
नंदन नीलकेनीच्या ऐकीव राजकीय प्रवेशानिमित्त!अवती भोवती
नवं - जुनंअवती भोवती
नामवंत, सचिन आणि राज्यसभाअवती भोवती
निःशब्द !अवती भोवती
फेसबुक, Whatsapp आणि एकाग्रताअवती भोवती
बयेचा कारनामा !अवती भोवती
बोलघेवड्या मोटारगाड्या !अवती भोवती
भाग्यपरिवर्तनअवती भोवती
भावनाकल्लोळ!अवती भोवती
मी whatsapp वर नाही! तुमचं काय?अवती भोवती
मी किती Predictable !!अवती भोवती
मीठचौकीचा तारणहार ??अवती भोवती
मुंबईचा पाऊस !अवती भोवती
मेंदुचे संरक्षण !अवती भोवती
रिसेप्शनला उशिरानं येणारी वधु !अवती भोवती
सचिनच्या निवृत्तीसोहळ्याचे इतर परिणाम (Side Effects)!अवती भोवती
सरमिसळ - २०१५ !!अवती भोवती
सरोगसी - एकल पालकत्वअवती भोवती
साप्ताहिक सुट्टी आणि नोकरदार वर्ग!अवती भोवती
साहेब ऊवाच!अवती भोवती
सूर्याच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांचे परस्पर रूपांतरण!अवती भोवती
हँडवॉशअवती भोवती
सलाम राहुल !अवती भोवती, क्रिकेट
मत्स्यबाजारअवती भोवती, जीवनज्ञान
एक खंत!अवती भोवती, जुना काळ - नवा काळ
गेले ते दिन गेले!अवती भोवती, जुना काळ - नवा काळ
दुरावलेली दिवाळी !अवती भोवती, जुना काळ - नवा काळ
४x वा वाढदिवस!आत्मचरित्र
IT मधल्या रात्रपाळ्या - भाग १आत्मचरित्र
IT मधल्या रात्रपाळ्या - भाग २आत्मचरित्र
गाणी - सोहमची, आईवडिलांची आणि आमच्या तिघांची !आत्मचरित्र
दहावीची शिकवणी !आत्मचरित्र
दिवाळीचे दिवस!आत्मचरित्र
न्यू इंग्लिश स्कूल वसई- शालेय जीवनातील आठवणीआत्मचरित्र
ब्रायटन वास्तव्य - भाग १आत्मचरित्र
ब्रायटन वास्तव्य - भाग २आत्मचरित्र
ब्रायटन वास्तव्य - भाग ३आत्मचरित्र
ब्रायटन वास्तव्य - भाग ४आत्मचरित्र
ब्रायटन वास्तव्य - भाग ५आत्मचरित्र
ब्रायटन वास्तव्य - भाग ६आत्मचरित्र
ब्रायटन वास्तव्य - भाग ७आत्मचरित्र
ब्रायटन वास्तव्य - भाग ८आत्मचरित्र
भेटीगाठी!!आत्मचरित्र
मन वढाय वढाय! - भाग १आत्मचरित्र
मन वढाय वढाय! - भाग २आत्मचरित्र
मन वढाय वढाय! - भाग ३आत्मचरित्र
रम्य ते बालपण - १आत्मचरित्र
रम्य ते बालपण - २आत्मचरित्र
रम्य ते बालपण - ३आत्मचरित्र
रम्य ते बालपण - ४आत्मचरित्र
Manu's Farm House Wedding!!कुटुंब नाती
गवाक्षकुटुंब नाती
एकोणतीस सक !!कुटुंब नाती, सामाजिक
Cricket ऊहापोह - Men Vs Boysक्रिकेट
IPL च्या मोहमयी विश्वात!क्रिकेट
कार्तिक महिमाक्रिकेट
क्रिकेट आणि निराशाक्रिकेट
क्रिकेट आणि मी (भाग १)क्रिकेट
क्रिकेट आणि मी (भाग २)क्रिकेट
क्रिकेट आणि मी (भाग ३) - सरदार पटेल कॉलेजक्रिकेट
खट्याळ वासरू !क्रिकेट
१ ते १०० ह्या सर्व संख्यांनी पूर्ण भाग जाणारी सर्वात छोटी (?) संख्या!गणित
आगगाडीच्या गणिताचे काही प्रकार !गणित
एकचल रेषीय समीकरणेगणित
गणित - काळ आणि काम (श्रम)गणित
गणित - काही प्रश्नोत्तरेगणित
गणित - काही भागाकार तत्वेगणित
गणिती पाढेगणित
ल. सा. वि. - म. सा. वि. - भाग १गणित
ल. सा. वि. - म. सा. वि. - भाग २गणित
हा खेळ आकड्यांचा!!गणित
Offlineचिंतन
Bigg Bossचित्रपट मालिका गीत
Ventilatorचित्रपट मालिका गीत
WELCOME जिंदगी!!चित्रपट मालिका गीत
आप यूँ फासलों से ...चित्रपट मालिका गीत
आपला मानूसचित्रपट मालिका गीत
और क्या अहद- ए-वफा होते हैं!चित्रपट मालिका गीत
कट्यार काळजात घुसली!!चित्रपट मालिका गीत
'काहे दिया परदेस' च्या निमित्तानं !चित्रपट मालिका गीत
केळीचे सुकले बागचित्रपट मालिका गीत
गुलजार आंधी चित्रपटचित्रपट मालिका गीत
गुलजार भाग १चित्रपट मालिका गीत
गुलजार भाग २ - घर चित्रपटचित्रपट मालिका गीत
गुलजार भाग ३ - 'मेंरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा हैं'चित्रपट मालिका गीत
गुलाबजाम !!चित्रपट मालिका गीत
चेन्नई एक्स्प्रेस - एक सुंदर रंगरंगोटी!चित्रपट मालिका गीत
ज्युरासिक वर्ल्ड !!चित्रपट मालिका गीत
तन्नू आणि मन्नू - विवाहोत्तर प्रवासचित्रपट मालिका गीत
दो नैना और एक कहानी!चित्रपट मालिका गीत
नटसम्राट - एक सामाजिक शिकवण!!चित्रपट मालिका गीत
फक्त ....शिवायचित्रपट मालिका गीत
लिंक रोड - दीडेक तास किशोरजींच्या सोबतचित्रपट मालिका गीत
लिंबलोण उतरू कशी - सुमन कल्याणपूरचित्रपट मालिका गीत
वो शाम कुछ अजीब थी - भाग १चित्रपट मालिका गीत
वो शाम कुछ अजीब थी - भाग २चित्रपट मालिका गीत
वो शाम कुछ अजीब थी - भाग ३ विद्या सिन्हाचित्रपट मालिका गीत
श्रीदेवीचित्रपट मालिका गीत
सैराट - एक विश्लेषणचित्रपट मालिका गीत
होणार जावई मी त्या घरचा! वकाव!चित्रपट मालिका गीत
एकवार पंखावरून फिरो तुझा हात! - चित्रपट वरदक्षिणाचित्रपट मालिका गीत, जीवनज्ञान
या बकुळीच्या झाडाखाली !चित्रपट मालिका गीत, जीवनज्ञान
"मेसी" क्षण !जीवनज्ञान
२०१७ मननजीवनज्ञान
Avalancheजीवनज्ञान
Bariwaliजीवनज्ञान
Critiqueजीवनज्ञान
Empathyजीवनज्ञान
Etiquette ची ऐशी की तैशीजीवनज्ञान
Fast Trackingजीवनज्ञान
Finished But Not Perfectजीवनज्ञान
GSTजीवनज्ञान
HeatMapजीवनज्ञान
Multitaskingजीवनज्ञान
Return of मन वढाय वढाय !!जीवनज्ञान
Valentine दिवस !जीवनज्ञान
अंतर्मुखजीवनज्ञान
अदृश्य कॅमेरा!जीवनज्ञान
अलिप्ततावाद!!जीवनज्ञान
आकर्षक वेष्टन!जीवनज्ञान
आकाशी झेप घे रे पाखरा!!जीवनज्ञान
आतले आणि बाहेरचेजीवनज्ञान
आपले विश्व आणि आयुष्यातील टप्पे!जीवनज्ञान
आयुष्यावर बोलू काही!जीवनज्ञान
उपवासजीवनज्ञान
एक धागा ...जीवनज्ञान
एका नोटेचे महाभारत !जीवनज्ञान
कालबाह्य !!!जीवनज्ञान
किंवा Versus आणि !जीवनज्ञान
क्षणभंगुर ते शाश्वतजीवनज्ञान
गॅलरी!जीवनज्ञान
घोंघावणाऱ्या शक्यतांचं भेंडोळं !जीवनज्ञान
जन पळभर म्हणतील हाय हाय!जीवनज्ञान
जागतिक महिला दिन!जीवनज्ञान
जीवनगाणे!जीवनज्ञान
ज्ञानग्रहण आणि अभिव्यक्तीजीवनज्ञान
टोमणेजीवनज्ञान
तमसो मा ज्योतिर्गमय!जीवनज्ञान
तु अशी जवळी ..जीवनज्ञान
थोरत्व - कालपरत्वेजीवनज्ञान
दडलेले सुखक्षण !जीवनज्ञान
दीर्घ पल्ल्यांची उद्दिष्टे!!जीवनज्ञान
नववर्षचिंतन !जीवनज्ञान
निश्चितता की अनिश्चितता !जीवनज्ञान
पालकत्व - जुनं आणि नवं!जीवनज्ञान
मी आणि मी - एक संवादजीवनज्ञान
यश, समाधान वगैरे वगैरे!जीवनज्ञान
यशस्वी भव!जीवनज्ञान
योग्य - अयोग्य संभ्रम !!जीवनज्ञान
योग्य करियरच्या शोधात !जीवनज्ञान
लग्नसमारंभ आणि पेहेराव!जीवनज्ञान
लवचिकताजीवनज्ञान
वाट - हरवलेली , गवसलेलीजीवनज्ञान
विक्रम आणि वेताळजीवनज्ञान
वेगवान मार्गिका !!जीवनज्ञान
वेळेचा सदुपयोग करण्याचे काही मार्ग!जीवनज्ञान
व्यक्ती ते वैचारिक संस्था!!!!जीवनज्ञान
व्यापक दृष्टीकोन!जीवनज्ञान
व्यावसायिक मनाचा वेध!जीवनज्ञान
व्यावसायिक संज्ञा !!!जीवनज्ञान
शोध स्वः त्वाचा !!जीवनज्ञान
श्रीमंतवर्गाच्या भुमिकेतून !जीवनज्ञान
श्रोताजीवनज्ञान
संख्यारेषा आणि मनः स्पंदने!जीवनज्ञान
संयम - आधुनिक चालीरितीजीवनज्ञान
समय तू धीरे धीरे चल !जीवनज्ञान
सुखाचे पुनर्रव्याख्यीकरणजीवनज्ञान
सुज्ञता !!जीवनज्ञान
स्थिर विरुद्ध डायनॅमिक!!जीवनज्ञान
स्नेहसंमेलन गाथा !!जीवनज्ञान
स्व - अनुभव - फक्त दुसऱ्यांच्या नजरेतून!!जीवनज्ञान
स्वभावपैलुजीवनज्ञान
यंत्रांचे शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता !जीवनज्ञान, माहिती आणि तंत्रज्ञान
इस्त्रीजुना काळ - नवा काळ
The Remains of the Day - भाग १पुस्तक परीक्षण
अश्रू - वि. स. खांडेकरपुस्तक परीक्षण
मुसाफिर - अच्युत गोडबोलेपुस्तक परीक्षण
वन नाईट @ द कॉल सेंटर - चेतन भगतपुस्तक परीक्षण
शाळा - मिलिंद बोकीलपुस्तक परीक्षण
साथ सोबत!पुस्तक परीक्षण
हूल - भालचंद्र नेमाडेपुस्तक परीक्षण
२०११ मार्च केरळ सहल पुनर्लेखनप्रवास
एकवीरा देवी, महड गणपती दर्शनप्रवास
कोकण २०१८ - भाग १प्रवास
कोकण २०१८ - भाग २प्रवास
कोकण २०१८ - भाग ३प्रवास
कोकण २०१८ - भाग ४प्रवास
कोकण २०१८ - भाग ५प्रवास
फ्लोरिडा ते मुंबई ५३ तास - प्रवासवर्ण​न भाग २प्रवास
फ्लोरिडा ते मुंबई ५३ तास - प्रवासवर्णन भाग १प्रवास
बर्फाळ दिवसप्रवास
वायथिरी रिसॉर्ट - वायनाडप्रवास
विमानप्रवास - मुलभूत माहिती - भाग १प्रवास
विमानप्रवास - मुलभूत माहिती - भाग २प्रवास
विमानप्रवास - मुलभूत माहिती - भाग ३प्रवास
विमानप्रवास - मुलभूत माहिती - भाग ४प्रवास
वीणा वर्ल्ड - सिंगापुर हॉंगकॉंग मकाव - भाग १प्रवास
वीणा वर्ल्ड - सिंगापुर हॉंगकॉंग मकाव - भाग २प्रवास
वीणा वर्ल्ड - सिंगापुर हॉंगकॉंग मकाव - भाग ३प्रवास
वीणा वर्ल्ड - सिंगापुर हॉंगकॉंग मकाव - भाग ४प्रवास
वीणा वर्ल्ड - सिंगापुर हॉंगकॉंग मकाव - भाग ५प्रवास
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस १प्रवास
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस २प्रवास
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ३प्रवास
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ४प्रवास
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ५प्रवास
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ६प्रवास
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ७प्रवास
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ८ - ९प्रवास
सापुतारा प्रवास भाग १प्रवास
सापुतारा प्रवास भाग २प्रवास
सिमला कुलू मनाली वीणा वर्ल्डप्रवास
अंक १, २, ३…भन्नाट
अव्यक्त भावनांचं कोंदण!भन्नाट
चंद्रवसाहत - भाग १!भन्नाट
थिजलेल्या एका क्षणी!भन्नाट
सरस्वती विद्या मंदिर १९xx बॅचमन स्पंदन
सांग सांग भोलानाथ!!मन स्पंदन
Trapped - अंतिम भागमराठी कथा
Trapped - भाग १मराठी कथा
Trapped - भाग २मराठी कथा
Trapped - भाग ३मराठी कथा
Trapped - भाग ४मराठी कथा
Trapped - भाग ५मराठी कथा
Trapped - भाग ६मराठी कथा
Trapped - भाग ७मराठी कथा
Trapped - भाग ८मराठी कथा
अनोखी रात्र - भाग १मराठी कथा
अनोखी रात्र - भाग २मराठी कथा
अनोखी रात्र - भाग ३मराठी कथा
अनोखी रात्र - भाग ४मराठी कथा
अनोखी रात्र - भाग ५मराठी कथा
अनोखी रात्र - भाग ६मराठी कथा
आभास - एक काल्पनिक जग!!मराठी कथा
जाणता अजाणता - एक मनोद्वंदमराठी कथा
दुरावा - १मराठी कथा
दुरावा - १०मराठी कथा
दुरावा - ११मराठी कथा
दुरावा - १२मराठी कथा
दुरावा - १३मराठी कथा
दुरावा - २मराठी कथा
दुरावा - ३मराठी कथा
दुरावा - ४मराठी कथा
दुरावा - ५मराठी कथा
दुरावा - ६मराठी कथा
दुरावा - ७मराठी कथा
दुरावा - ८मराठी कथा
दुरावा - ९मराठी कथा
दुरावा - अंतिम भागमराठी कथा
वारसदार - अंतिम भागमराठी कथा
वारसदार - भाग १मराठी कथा
वारसदार - भाग २मराठी कथा
वारसदार - भाग ३मराठी कथा
वारसदार - भाग ४मराठी कथा
वारसदार - भाग ५मराठी कथा
वारसदार - भाग ६मराठी कथा
वारसदार - भाग ७मराठी कथा
वारसदार - भाग ८मराठी कथा
साद - भाग १मराठी कथा
डेट भेटललित
वसंत बहरत नाही!ललित
सकाळचा चहा आणि शब्दांच्या पलीकडलं !ललित
समुद्रकिनाराललित
१९८५ बॅच - सातत्याचे कौटुंबिक आणि सामाजिक भान !!वसई
I MISS YOU पांगारा!वसई
NPL गाथा - भाग १वसई
आकाश पांघरुनी !!वसई
आनंदठेवा!वसई
आमच्या बँचचे स्नेहसंमेलनवसई
न्यू इंग्लिश स्कूल प्रिमियर लीग - २०१४वसई
बावखलवसई
मस्त्यगाथा !!वसई
वर्षा वसईवसई
वसई ते मुंबई - शिक्षण , नोकरीसाठी प्रवास!वसई
वसईचा ख्रिसमस आणि बौद्धिकवसई
वसईची पिशवीवसई
वसईतील शेतीउद्योगाचे भवितव्य!वसई
होळी, वसईचे केशकर्तनालयवसई
होळीबाजार - आनंदठेवा भाग २वसई
RTव्यक्ती आणि वल्ली !
VNUव्यक्ती आणि वल्ली !
अजातशत्रू, अष्टपैलू व्यक्तिमत्व - उज्ज्वल !व्यक्ती आणि वल्ली !
निष्काम समाजयोगी !व्यक्ती आणि वल्ली !
शिक्षणमहर्षी डोंगरेसर!!व्यक्ती आणि वल्ली !
Invest, Divest की Decommissionव्यावसायिक जीवन
Substance Vs Styleव्यावसायिक जीवन
गुंतागुंतव्यावसायिक जीवन
महाविद्यालयीन आवार मुलाखत (कॅम्पस इंटरव्यू)व्यावसायिक जीवन
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र - एका बदलत्या चित्राच्या निमित्तानेव्यावसायिक जीवन
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र - एका बदलत्या चित्राच्या निमित्ताने - अंतिम भागव्यावसायिक जीवन
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र - एका बदलत्या चित्राच्या निमित्ताने - भाग २व्यावसायिक जीवन
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र - एका बदलत्या चित्राच्या निमित्ताने - भाग ३व्यावसायिक जीवन
वसईचा पाऊस आणि व्यावसायिक वर्ग !व्यावसायिक जीवन
वसईची लाईट!व्यावसायिक जीवन
वार्षिक कामगिरीचा आढावा - Appraisalव्यावसायिक जीवन
विचारमंथन !व्यावसायिक जीवन
व्यवसायगाथा!व्यावसायिक जीवन
शिखरमार्ग !व्यावसायिक जीवन
शिखरापल्याड!व्यावसायिक जीवन
स्थलांतर!व्यावसायिक जीवन
‘नवे कुटुंब, नवा तोल; नवे उपाय, नवे बोल।’सामाजिक
२०३५ - सक्रिय @ ६५सामाजिक
Cool… अनुकूल की प्रतिकूल !सामाजिक
Generic Medicine - चर्चासत्रसामाजिक
My Space- जागतिक महिला दिवस !सामाजिक
PICTURE PERFECT - भाग २सामाजिक
PICTURE PERFECT अर्थात परिपूर्ण चित्रसामाजिक
To Do Listसामाजिक
आधुनिक नाती!सामाजिक
आयुष्याच्या ह्या टप्प्यावरसामाजिक
इंटरनेट ऑफ द .. - भाग १सामाजिक
इंटरनेट ऑफ द .. - भाग २सामाजिक
कबुतरांना दाणे देणारे अविचारी जन !सामाजिक
कहानी घर घर की!सामाजिक
क्षणभंगुर आनंदाच्या शोधात!!सामाजिक
गाव तसा स्वभाव ??सामाजिक
गोंधळलेला बुद्धिमान वर्ग - भाग दुसरासामाजिक
गोंधळलेला बुद्धिमान वर्ग!!सामाजिक
ग्यान, गलका, शिराळा, कसाबसामाजिक
चौथी पाससामाजिक
जगी सर्व सुखी असा कोण आहे?सामाजिक
दोन समारंभांची एक गोष्ट!सामाजिक
दोष ना कुणाचा!सामाजिक
निरंजन - एक मन उधाण वाऱ्याचे!सामाजिक
निरंजना - घार उडे गगनी पण लक्ष तिचे घरट्याशी!!सामाजिक
पृथ्वीचा आयुष्यकालसामाजिक
फ्लोरिडातील आक्रमक पक्षी ते बोरिवलीतील चिमणी घरटेसामाजिक
बायकोचे बोल!सामाजिक
बावखलसामाजिक
भावनिक सक्षमता - तुझं आहे तुझपाशीसामाजिक
मदिराप्राशनास समाजमान्यतासामाजिक
मनःशांतीसामाजिक
मनाचा तो हळवा कप्पा!!सामाजिक
मराठी पाऊल पडते…सामाजिक
मुंबई पुणे एक्सप्रेस वे अपघातसामाजिक
मुंबईचा संभ्रमसामाजिक
मेड (Maid) इन अमेरिका ते मेड (Maid) इन बोरीवली!सामाजिक
मॉल, पिझ्झा, IPL आणि उंचावलेली जीवनशैलीसामाजिक
या सुखांनो या!सामाजिक
लेक लाडकी ह्या घरची…सामाजिक
लोकसभेसाठी आम्हीच का? - राजकीय पक्षांचा एक परिसंवाद - भाग १सामाजिक
लोकसभेसाठी आम्हीच का? - राजकीय पक्षांचा एक परिसंवाद - भाग २सामाजिक
वटवृक्षसामाजिक
वसंतास पत्र!सामाजिक
वाङनिश्चय (Engagement) सोहळा - एक वाढतं प्रस्थसामाजिक
विवाह संस्था !सामाजिक
व्यक्तिवादी दृष्टिकोन जिंकला, राज्य हरलं, रयत हरली!सामाजिक
सत्यनारायणाच्या पूजेचे आधुनिक व्रत!सामाजिक
सर्वांगीण विकासाची ऐसी की तैसी !सामाजिक
सामाजिक जीवनातील मध्यमवर्गीयांचा सहभाग!सामाजिक
सुख शोधितो मी!सामाजिक
पर्ण, दवबिंदु . . .